ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बेल्ह्यात विहिरीतील गाळ काढताना 3 मजुरांचा गुदमरुन मृत्यू

मंचर, दि. 20 (प्रतिनिधी)-बेल्हा (ता. जुन्नर) येथील पिंगटआळी मधील विहिरीत घाण व गाळ काढण्यासाठी गेलेल्या 3 मजुरांचा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास घडली. रात्री उशीरा अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी मजुरांचे मृतदेह बाहेर काढले.
विलास सुखदेव पवार (वय 25) सुखदेव बाबूराव पवार(वय 55) हे पितापुत्र तसेच संदीप राजू पवार (वय 22) अशी मृतांची नावे असून तिघेही बेल्हा इंदिरानगर कॉलनी येथील रहिवासी आहेत. संदीप हा विलासचा चुलतभाऊ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची ही विहीर आहे. या विहिरीतून घाण व गाळ काढण्यासाठी हे तिघे जण आले होते. विहिरीतून मोठ्या प्रमाणावर उग्र वास येत होता. त्या विहिरीत थोडे पाणीही होते. गाळ काढण्यासाठी सर्वप्रथम संदीप हा विहिरीत उतरला. त्याला उग्र वास येताच भोवळ आली आणि तो त्यात अडकला. त्याला वाचविण्यासाठी विलास हा उतरला. तो ही उग्र वासामुळे गुदमरला. त्याला काढण्यासाठी सुखदेव पवार हे ही विहिरीत उतरले. ते ही उग्र वासामुळे गुदमरले. चौथा
मात्र यांची अवस्था पाहूनच विहिरीच्या मध्यातूनच वर आल्याने बचावला.