ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

रेड झोनचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर-खा. श्रीरंग बारणे

देहूरोड, दि. 20 (प्रतिनिधी)-रेड झोनचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून, लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांना दिली.
मावळचे खासदार बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुन्हा एकदा रेड झोनच्या प्रश्नाबाबत साकडे घातले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रेड झोनचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता खासदार बारणे व आढळराव पाटील पाठपुरावा करीत आहेत. आजही दोन्ही खासदारांनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या प्रश्नाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. बैठकीविषयी माहिती देताना बारणे म्हणाले, सरंक्षणमंत्र्यांची भेट घेतली. त्यात रेड झोनचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून, चालू लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावत असून, त्यासाठी दिनांक 26 जुलैला रेड झोन क्षेत्रातील संसद सदस्यांबरोबर व संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक बोलावली असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले.