ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाठपुराव्यानंतर चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर गतिरोधकासह बसले दिशादर्शक फलक

चाकण, दि. 26 (प्रतिनिधी)- चाकण - शिक्रापूर या राज्यमार्गावर सातत्याने होत असलेल्या लहान मोठ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर येथे गतिरोधकासह दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विशाल गार्डन समोर होणारे अपघात टळणार आहेत. या मार्गावर सुसाट वेगाने अवजड वाहतूक सुरु होती. आता या वाहनांना गतिरोधक व दिशा दर्शक फलकामुळे ब्रेक लागणार आहे. 
चाकण - शिक्रापूर मार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या मेदनकरवाडी पासून पुढे चाकण कडील भागात गतिरोधक व दिशा दर्शक फलक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत होती. त्यामुळे सातत्याने गंभीर ते किरकोळ स्वरूपाचे अपघात होत होते. यासाठी याच भागात राहणार्‍या युवकांनी पुढाकार घेत या भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून गतिरोधक व दिशादर्शक फलकाची निर्मिती केली़. यामुळे सुपातील जात्यात जाण्यापूर्वीच नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मेदनकरवाडी पासून पुढे असलेल्या माणिक चौक आणि तळेगाव चौकातून परिसरातील नागरिकांना शहरात दाखल होण्याकरिता मार्ग आहे. या चौकातच वाहनांची आणि नागरिकांची तशीही येथे वर्दळ असते. याच चौकांत प्रवाशांना बस पकडावी लागते. यामुळे प्रवाशांचीही या चौकात वर्दळ असते. या मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि वाढते अपघात पाहता येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत होते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती़. संभाव्य धोका लक्षात घेता, याच भागातील रहिवासी असलेले भाजपचे शहर उपाध्यक्ष मनोज पिंगळे  व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून याकडे लक्ष वेधले. याची दखल घेत प्रशासनाने गतिरोधकासह दिशादर्शक फलक तयार केल्याने वाहनचालक तसेच नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.