ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शहराध्यक्ष म्हणतात आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक

राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक आहे. मात्र, आघाडी करण्याविषयीचा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला पाहिजे आणि तो प्रस्ताव सन्मानजनक असला पाहिजे. सर्व जागा लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे. मतविभागणी नको म्हणून राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा प्रस्ताव आहे.

केंद्र व राज्य सरकार सर्व आघाडय़ावर अपयशी ठरले आहेत. सरकारकडून पिंपरी-चिंचवडला सापत्न वागणूक दिल्याचे अनेक प्रकरणांमधून दिसून आले. शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. ‘भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त पिंपरी-चिंचवड’ हे काँग्रेसचे घोषवाक्य आहे. याशिवाय, सार्वजनिक व्यवस्था, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, नदीसुधार प्रकल्प, प्रशासनाकडून नागरिकांची होणारी पिळवणूक, झोपडीधारकांच्या अडचणी आदी मुद्दय़ांवर काँग्रेसचा भर राहणार आहे.

* निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे?

दोन वर्षांपूर्वीपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे. आधी संघटनात्मक परिस्थिती नाजूक होती. नव्याने पक्षउभारणी केली. यापूर्वीच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांनी गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात सातत्याने आंदोलने केली. ‘काँग्रेस आपल्या दारी’ अभियान तसेच पक्षाचे विविध उपक्रम राबवले. पक्षाचे कार्यालय सुरू केले. चिंचवडला कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर झाले. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब विखे, हर्षवर्धन पाटील आदींनी मार्गदर्शन केले. दापोडीत नारायण राणे यांच्या, तर थेरगावात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.

* पक्षातील गळतीची कारणे कोणती, पक्षावर त्याचे परिणाम काय?

पक्षातील अतिमहत्त्वाकांक्षी नेत्यांमुळे पक्षाचे नुकसान झाले. स्वत:च्या स्वार्थासाठी ते पक्ष सोडून गेले. पक्षाच्या ‘त्या’ यंत्रणेमुळे गळती झाली. यापूर्वीच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याने काहींनी पक्ष सोडला. तर, ज्यांचा पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नव्हता, अशी मंडळी नाइलाजाने पक्षात आली. स्वार्थ साध्य होताच ते मूळ ठिकाणी गेले. पक्षाच्या गळतीचा काहीही परिणाम होणार नाही. नगरसेवक गेले असले तरी कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. खऱ्या कार्यकर्त्यांना आता न्याय मिळू शकेल.