ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड

निगडी, दि. १८ - क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १६)  चिखली येथील हरगुडे वस्ती येथे करण्यात आली. त्यांच्याकडून ९२ हजार ४००  रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.



योगेश दत्तात्रय जाधव (वय ३१, रा. चिखली) आणि अनिल रामकिसन अगरवाल (वय ४५, रा. पिंपरी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरगुडे वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर यांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी आरोपी २०-२०0 क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असताना दिसले. त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे चार मोबाईल फोन, एक टीव्ही, १२ हजार रुपयांची रोकड, असा ९२ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.