ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रा. मोरे महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

>> "स्मार्ट सिटी' व पर्यटन या विषयी होणार उहापोह 

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) - स्मार्ट सिटी आणि पर्यटन यांचा जवळचा संबंध असून पायाभूत सुविधांचा विकास दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक घटकांचा विचार व्हावा या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये २० व २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

या चर्चासत्राचे उद्‌घाटन दि. २० जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय गोवा येथील प्राचार्य डॉ. नंदकुमार सावंत यांचे बीजभाषण होणार आहे. चर्चासत्राचा समारोप दि. २१ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता प्रधान सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत होणार आहे. माजी आयुक्त टी. सी. बेंजामिन, डॉ. सुनील धापटे, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इनफरमॅटीक्‍स येथील डॉ. नवेंदू चौधरी चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत. 

चर्चासत्रामध्ये पर्यटनाचे विविध प्रकार आणि स्मार्ट सिटी, पर्यटनाच्या दृष्टीने स्मार्ट सिटीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पर्यटनाची क्षमता, स्मार्ट सिटी व्यवस्थापन, राजकीय पक्षांची स्मार्ट सिटीतील भूमिका अशा विविध मुद्दयांवर चर्चा घडवून आणली जाणार आहे. हे चर्चासत्र शिक्षक, संशोधक, व्यापार प्रतिनिधी, शासकीय संस्था, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती तसेच नियोजनकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरेल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.