ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जबाबदारीचे भान ठेवून वाहन चालवा - सोनाली कुलकर्णी

>> रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप 

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) - आपला आणि आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी जबाबदारपणे वाहन चालवा, असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आकुर्डी येथे केले. 

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ती बोलत होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहन देशमुख, मोटार वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. 

सोनाली कुलकर्णी म्हणाली की, ड्रायव्हिंग करणे हे आपले पॅशन आहे. परंतु, वाहन चालविताना मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करते हे सांगताना तिने विद्यार्थ्यांकडून तिने आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करू असे वदवून घेतले. आपल्या जवळच्या व्यक्तीचा अपघातामुळे त्याच्या अकस्मात जाण्याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि त्याचे काय दुःख असते याची आपल्या जाणिव असल्याचे तिने यावेळी सांगितले. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच वाहतूक नियम आपल्या अंगी बाणावेत, असे आवाहन तिने केले. 

यावेळी वाहतूक सुरक्षेविषयी झालेल्या चालता बोलता या कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्यात सागर सोनवणे, विश्वास पन्हाळकर, विकी तेलतुंबडे, स्नेहा राऊत, रोशनी तरस या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालयात संपन्न झालेल्या रस्ता सुरक्षा अभियान या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये उपलब्ध झालेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 

अजित शिंदे, मोहन देशमुख, डॉ. नितीन घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत माने यांनी आभार मानले. डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. बी. जी. लोबो, अशोक परंडवाल, सचिन इंदुरे, प्रकाश लांडगे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात पुढाकार घेतला.