ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शिस्त पालनात नागरिकांनीही "स्मार्ट' व्हायला हवे!

>> 'स्मार्ट सिटी'वरील चर्चासत्रात सूर
>> विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) - 'स्मार्ट सिटी' योजनेच्या माध्यमातून शहरे "स्मार्ट' होत असताना नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना शिस्त पालन करुन नागरिकांनीही "स्मार्ट' व्हायला हवे, असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये "स्मार्ट सिटी आणि पर्यटन' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही अपेक्षा व्यक्त केली. चर्चासत्राचे उद्‌घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, गोव्यातील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार सावंत, प्रा. मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. शोधनिबंधांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 

चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. नंदकुमार सावंत यांनी स्मार्ट सिटी आणि पर्यटन या दोनही गोष्टी एकमेकांशिवाय शक्‍य नसल्याचे सांगितले. जगभरातील स्मार्ट शहरांची उदाहरणे त्यांनी दिली. शहरातील नागरिकांचे जीवन सुखी व्हावे यासाठी स्मार्ट सिटी योजनेत छोटछोट्या गोष्टींचा विचार केला जातो. बार्सिलोना सारख्या शहरात प्रवास करण्यासाठी एकदाच तिकीट काढावे लागते. त्यामध्ये बस, मेट्रो कोणत्याही साधनाने प्रवास करता येत असल्याचे सांगितले. अशा प्रकारे पायाभूत सुविधा वाढल्यास पर्यटक आकर्षित होतील आणि त्यामुळे त्या प्रदेशाचा विकास होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात माजी आयुक्त डॉ. टी. सी. बेंजामिन यांनी मार्गदर्शन करताना शहरामधील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता, वाहतूक या गोष्टींवर भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. खूप मोठ्या गोष्टींच्या मागे न लागता या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मागास घटकांचा विचार करून त्यांना सुविधा कशा उपलब्ध होतील याकडे स्थानिक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून त्याप्रमाणे नियोजन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. 

डॉ. सुनील धापटे यांनी स्मार्ट सिटीमधील पर्यटन क्षमता या विषयावर आपली मते मांडली. स्मार्ट शहरे या गोष्टीवर विचार करताना अनेक बारीक बारीक गोष्टींचा विचार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. इथले लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा तिथे शिस्त बाळगतात पण परत इथे आल्यानंतर मात्र इथल्यासारखे वागतात. शहरासाठी एक तास ही संकल्पना राबविल्यास प्रत्येक जण स्वतःचे योगदान देवू शकेल, असेही त्यांनी सांगितले. 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खनिजदार मोहन देशमुख, डॉ. ए. आर पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप झाला. डॉ. निलेश दांगट, डॉ. तुषार शितोळे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. बी. जी. लोबो, डॉ. बी. एल राठोड, डॉ. एम. के. चैधरी, प्रा. एस. एल. भोई, प्रा. तानाजी खरसिंगे, प्रा. दिनकर चव्हाण, प्रा. संतोष वाढवणकर, अशोक परंडवाल, सचिन इंदूरे यांनी चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.