ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मॉडर्न विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) - यमुनानगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कुलमधील शालेय विद्यार्थ्याना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी माध्यमिक विद्यालयातील प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, कृत्रिम आपत्तीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच, आग लागणे, भूकंपाचे हादरे बसणे, इमारत जिन्यामधील चेंगराचेंगरी, वीजेचे शॉर्टसर्किट यासह पूर परस्थितीबद्दल प्रसंगाचे सविस्तर वर्णन करून, सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अचानक आलेल्या आपत्तीमध्ये आपण घ्यावयाची काळजी, तत्काळ करावयाच्या उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांना अनोळखी वस्तू, बॉम्बसदृस्य वस्तू आणि आतंकवाद याबद्दलही विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी जागृत नागरिकांनी कोणती कर्तव्ये, कशी पाळावीत यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, अग्निशमन यंत्राचा वापर कसा करावा, त्यांचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी मॉडर्न संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, मुख्याध्यापक गोकुळ कांबळे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख खंडू खेडकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, गंगाधर वाघमारे, आशा कुंजीर, साधना राऊत उपस्थित होते.