ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रावेत अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

पिंपरी, दि. ३१ - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. 

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीयांच्या जीवनावर आधारीत समाजप्रबोधनात्मक नाटिका सादर केली. तसेच नृत्य स्पर्धेतील नामांकित ठरलेली सुजल हरिदास हिने लावणीनृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, संगित, गायन, योगा आणि प्रबोधनात्मक नाटिकेमुळे ‘एक्सप्रेशन 2017’च्या या सोहळ्यात रंगत आली.
 
संमेलनात प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष पिपंरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त भाईजान काझी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. पी.जे. अवसरे, प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, कलाकार संदीप पाटील, एस.बी.पाटील स्कूलच्या मुख्याध्यापीका मधूबाला गैरोला, प्राचार्य अनुजा कामठे, रावेत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एच.यू.तिवारी आदी उपस्थित होते. 

यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध क्रिडास्पर्धा व उपक्रमांच्या स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. नोबल वर्गीस, ओंकार पाटील, सुरिधा चक्रवर्ती, चिराग शाह, शाम येसणे, सुश्मिता पाटील, प्रीती चव्हाण, धीरज सुखवानी, अजीन अब्राहम, कार्तिक किंगे, ओमकार केदार, अतीक जैन, रिशभ जैन यांनी संयोजनात सहभाग घेतला. प्रा. प्रिया ओघे यांनी आभार मानले.