ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चिंचवड मतदारसंघामध्ये मतदार ओळखपत्र वाटपास मुदतवाढ

चिंचवड, दि. १ - चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारयादीत नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मतदारांना अजून ओळखपत्र मिळाले नसेल अशांसाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सर्व ६० पदनिर्देशित ठिकाणी दिनांक १६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत नोंदणी करणेत आलेल्या नवीन मतदारांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र दिनांक २४ जानेवारी पासून वाटप करण्यात येत आहे. 

दिनांक ३१ जानेवारी २०१७ अखेर २५ ते ३०% ओळखपत्रांचे वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे ओळखपत्र वाटप करण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मतदान केंद्राचे शाळेमध्ये संपर्क साधून सकाळी ११ ते २ या वेळेत घेणे. दिनांक १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ओळखपत्र वाटपाचे कामकाज सुरु राहील.

तरी नागरिकांनी त्यांचे नजीकचे मतदान केंद्रावरुन मतदार छायाचित्र ओळखपत्र घेऊन जाणेबाबत मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी आवाहन केले आहे.