ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चिंचवडमध्ये रेल्वेचा धक्का लागून मृत्यू

आत्महत्येचा पोलिसांना संशय

चिंचवड, दि. २ - चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील दळवी नगर झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या पुलाखाली रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा रेल्वेने धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सचिन बाबुराव जाधव (वय ३३, रा रुपीनगर) अस रेल्वे अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-पुणे ही रात्री ८.३० ची लोकल जात असताना सचिन जाधव हे दळवी नगर येथील पुलाखालून रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळेस लोणावळा- पुणे या लोकलने सचिन जाधव याना जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. 

रेल्वेची एवढी जोरात धडक होती की जाधव यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. विशेष म्हणजे जाधव हे मी चिंचवडला जाऊन येतो अस म्हटले होते. त्यामुळे ही घटना आत्महत्या तर नाही ना, असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस नाईक लोंढे हे करत आहेत.