ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सॅमसंग सर्व्हिस सेंटर फोडले

पिंपरी, दि. 4 (न्यूज मेट्रो) - दुकानाच्या खिडकीतून आतमध्ये घुसून चोरट्यांनी सॅमसंग सर्व्हिस सेंटरमधील रोकड चोरुन नेली. ही घटना आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास, निगडी येथे घडली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआरही चोरुन नेला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथील टिळक चौकात सॅमसंग  सर्व्हिस सेंटर आहे. दुकान मालकाने शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व्हिस सेंटर बंद केले होते. मध्यरात्री चोरटे खिडकीतून सर्व्हिस सेंटर मध्ये घुसले. चोरट्यांनी दुकानातील रोकड चोरुन नेली असून  मोबाईल फोन चोरुन नेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चोरटे सर्व्हिस सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होते. मात्र, चोरट्यांनी  सीसीटीव्हीफ कॅमे-याचे डीव्हीआर चोरुन नेला आहे. 
 
दुकानाचे मालक परगावी गेले आहेत. ते आल्यानंरतच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे, निगडी पोलिसांनी सांगितले.