ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेच्या निवडणूक रिंगणात पती-पत्नीच्या चार जोडया

पिंपरी, दि. 4 (न्यूज मेट्रो) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी अनेक घडामोडी घडत असताना तसेच नगरसेवकांना स्वत:चे तिकीट मिळविण्यात दमछाक होत असताना चार भाग्यवान जोड्यांना मात्र विविध पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने पती पत्नीच्या तीन जोड्यांना संधी दिली आहे. यामध्ये पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधून राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे हे दोघे निवडणूक लढविणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 23 थेरगावमधून सतीश दगडू दरकेर यांना तर, प्रभाग क्रमांक 24 आदित्य बिर्ला, म्हातोबानगर मधून त्यांच्या पत्नी माधुरी सतीश दरेकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 25 मधून मयूर कलाटे तर प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका स्वाती मयूर कलाटे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाणातून निवडणूक लढत आहेत.