ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तरुणावर कोयत्याने वार; थेरगावातील घटना

पिंपरी, दि. 7 (न्यूज मेट्रो) - रस्त्यावरील गाड्या बाजूला  घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि.6) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास थेरगाव येथे घडली. 
याप्रकरणी दिलसार नवाब शेख (रा. गुजर वस्ती), विक्रम वसंत पाडाळे (रा. सद्गुरु कॉलनी, वाकड), दिशान शेख (रा. वाकड), पक्या यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश कोतवाल (वय 19, रा. पवारनगर, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आकाश सोमवारी त्याच्या मित्रासोबत थेरगाव येथे गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आकाश याने आरोपींना रस्त्यावरील गाड्या बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी आकाश याला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत. 

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news