ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वास्तुविशारदांनी कलात्मकता जोपासत व्यावसायिकता वाढवावी - विकास भंडारी

एस.बी.पाटील आर्किटेक्चर महाविद्यालच्या ‘मृण्मय’ या वार्षिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन

चिंचवड, दि. ९ - नाविन्याचा ध्यास घेऊन इच्छाशक्तीच्या बळावर शेकडो वर्षांपूर्वी कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही मीनाक्षी मंदिराच्या खांबातून ध्वनीलहरी निर्माण करण्याचे अजब कलाकृती उभारण्याचे काम ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर त्या काळातील कलाकारांनी साध्य केले. असे ध्येय ठेवूनच सध्याच्या वास्तुविशारदांनी कलात्मकता जोपासत व्यावसायिकता वाढवावी असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद विकास भंडारी यांनी केले.
 
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन महाविद्यालच्या ‘मृण्मय’ या वार्षिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन भंडारी यांच्या हस्ते औंध येथील पंडीत भीमसेन जोशी कलादालनात करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्या उज्ज्वला पळसुले, समन्वयक प्रियांका लोखंडे, विक्रम हुंडेकर, जेकब वर्गीस, निकीता अपसंगी  आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन डॉ. गिरीष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवरील ‘जागतिक ऐतिहासिक वारसा हक्क’ जपणाऱ्या कलाकृतींबरोबरच भारतीय शहरी, ग्रामीण वातावरणास पुरक अशा प्रकल्पांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले होते.  

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भंडारी म्हणाले की, वास्तुशारदांनी आराखडा तयार करताना भारतीय हवामान, फेब्रुवारी ते मे महिन्यातील सूर्यकिरणांची दिशा व तीव्रता विचारात घ्यावी. शेकडो वर्षांपूर्वी आत्ताच्या काळातील तंत्रज्ञान, अवजारे उपलब्ध नसतानाही अथक परिश्रमाने अदभूत कलात्मक अविष्कार असणा-या कलाकृती त्या कलाकारांनी उभारल्या त्या अजूनही जशाच्या तशा आहेत. यामध्ये करमाळ्यातील देवीच्या मंदीरात उभारलेली दिपमाळ हलवल्यास दुसरी काही अंतरावरची दिपमाळ हलते. तसेच मीनाक्षी मंदीरातील दगडी खांबावर थाप मारल्यास सा-रे-ग-म-प-द-नि-सा प्रतिध्वनी येतो. अशा अद्‌भूत कलाकृती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यास आपल्या ज्ञानात वाढ होईल. या ज्ञानाच्या कक्षात रुंदावून नाविन्यपूर्णतेने स्वत:च्या कौशल्याचा वापर केल्यास व्यावसायिक यश निश्चित मिळेल. 

स्वागत प्राचार्या उज्ज्वला पळसुले, सूत्रसंचालन तण्मय गोरक्ष, इवेंजलीन थॉमस आणि आभार प्रा. प्राजक्ता पाटील यांनी मानले.