ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपळे गुरवमध्ये सोसायटीत सहा गाड्या अज्ञाताने पेटवल्या

चिंचवड, दि. १० (प्रतिनिधी) - पिंपळे गुरवमध्ये एका सोसायटीमध्ये सहा गाड्या पेटवल्या आहेत. पहाटे ४ च्या सुमारासची ही घटना घडल्या असून, या गाड्या कुणी आणि कशा पेटवल्या हे कारण अद्याप समजू शकलं नाही.

पिंपळे गुरवमधील योगेश नावाच्या इमारतीमधील ही घटना घडली. सकाळी ४ च्या सुमारास सोसायटीमध्ये धुर येऊ लागल्याने इमारातीतील कोणालाही खालती येता आले नाही. यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण आणले. या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत

यापूर्वीही पिंपरीमध्ये गाडी तोडफोडच्या घटना घडल्या होत्या. पण आता गाड्यांच्या जळीतकांडामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.