ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला - रामदास कदम

सेनेने टेकू काढताच मुख्यमंत्र्यांना औकात कळेल

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) - स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या जीवावर महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपाने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून, त्यांना या निवडणुकीत सुज्ञ मतदार स्मशानात गाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, अशी जळजळीत टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चिखली येथे केली.

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ साने चौक, चिखली येथे आणि काळेवाडी, पिंपरी येथे शुक्रवारी कदम यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, रामभाऊ उबाळे, इरफान सय्यद, विनायक रणसुभे, प्रभाग क्र. १ चे उमदेवार नितीन दगडू रोकडे, योगिता विनायक रणसुभे, ललिता सर्जेराव भोसले, नेताजी दादासाहेब काशिद, प्रभाग क्र. ११ चे उमेदवार ॲड. शिल्‍पा उमेश साळवे, कल्पना अनिल सोमवंशी, सचिन प्रभाकर सानप, सचिन वसंत जरे आदी उपस्थित होते.

यावेळी मतदारांना आवाहन करताना कदम म्हणाले की, सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर सेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून शिवसेना काम करित आहे. सेनेच्या आमदारांना सत्तेची लालसा नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची शिवसेनेच्या टेकूवर उभी आहे. हे त्यांनी विसरू नये. उध्दव ठाकरे यांनी आदेश देताच आम्‍ही राजीनामे देवू. खुर्चीचा टेकू काढला की मुख्यमंत्र्यांना त्‍यांची औकात कळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी काही तरी करतो, हे दाखविण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे एका झटक्‍यात हजारोंचा रोजगार गेला. काळा पैसा परदेशातून आणून प्रत्‍येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये देण्याऐवजी गोरगरिब महिलांनी बचत म्हणून घरातील डब्‍यात ठेवलेली रक्‍कम देखील काढून घेतली. मोदींच्या नोटबंदीला मतदार व्होटबंदी करून उत्तर देईल.

भाजपशी नाते तोडल्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये शक्‍ती संचारली आहे. आता विधानसभा निवडणुका कधीही झाल्‍या तरी विधानसभेवर भगवाच फडकेल आणि मी गृहमंत्री होवून राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या गुंडांना व भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकल्‍याशिवाय स्वस्‍थ बसणार नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड मधील जनता शहाणी आहे. आमच्या राजीनाम्याची जास्त काळजी अजित पवारांना आहे. त्यांना लोणी खाण्यासाठी सरकारमध्ये यायचे आहे. 

कल्याण-डोंबिवली, नागपूर, संभाजीनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित झाली. मात्र, पुणे, पिंपरी मधील नागरिकांवर अन्याय का, असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला. याबाबत केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्‍द पाळला नाही.

पंतप्रधान मोदी मात्र सीमेवर जवानांची हत्या होत असताना, नवाज शरिफ यांचा वाढदिवसाचा केक कापायला जातात. हिंदुस्थानच्या इतिहासात असे कधी घडले नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचे भवितव्य काय, असाही प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. मुंबईत सेनेने दिलेला शब्‍द पाळला आहे. केंद्रानेच मुंबईला पुरस्कार दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि सेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाने कोकणातील महिलांच्या डोक्‍यावरील हंडा उतरविला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर शिवसेनेलाच निवडून देतील, असा विश्वास कदम यांनी व्यक्‍त केला.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news