ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सांगवीत चोरटी महिला जेरबंद

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) - वृद्ध महिला आणि एकटे राहणाऱ्या व्यक्तींशी जवळीक साधून त्यांची फसवणूक करणाऱ्या तसेच फेशियल करत महिलांना गुंतवून घरात चोरी करणाऱ्या सराईत महिलेला सांगवी पोलिसांनी अटक केली.
 
कविता राजू ढोरे (वय ४५, रा. नवी सांगवी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रेखा अनंत कोळेकर (वय ५८, रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कोळेकर यांच्या घरातून ५ लाख ३९ हजार रुपयांचे दागिने कविता ढोरे हिने चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना कविता ढोरे हिचे नाव पुढे आले. तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. तिच्या घराची झडती घेतली असता ७७ ग्रॅम वजनाचे दागिने आढळून आले. पोलिसी खाक्‍या दाखवताच तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत असताना तिच्याकडे कसून चौकशी केली असता उरलेले काही दागिने राहत्या घराच्या टेरेसवर ठेवले असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे २२ तोळे दागिने जप्त केले, असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news