ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रत्येक मुलाची घडण्याची वेळ वेगवेगळी असते - डॉ. सलिल कुलकर्णी

'पापा कहते है बडा नाम करेगा' कार्यकमात पित्यांचा मुला मुलींच्या हस्ते सत्कार

पिंपरी, दि. १३ - आपल्‍या मुलांना उच्च श्रेणीत ढकलण्याच्या स्पर्धेमध्ये आजच्या पिढीतील आई बाबा वात्‍सल्‍यपूर्ण आनंदी जीवन जगणेच विसरून जात आहेत. जशी प्रत्‍येक फुलांची फुलण्याची वेळ निसर्ग नियमावर अवलंबून असते, त्‍याच प्रमाणे प्रत्‍येक मुलाची घडण्याची वेळ वेगवेगळी असते. मुलांशी मूल होऊन जगा. आई-वडील आणि मुलं एकत्रित राहणे आणि हसणे हे जगातील सर्वात आनंददायी आणि सुंदर चित्र आहे. असल्याचे मत प्रसिध्द संगीतकार गायक डॉ. सलिल कुलकर्णी यांनी सांगवी येथे व्यक्त केले. 

नवी सांगवी येथील स्‍व. मनसुखलालजी गुगळे यांच्या स्मृतीप्रित्‍यर्थ तनुश्री गर्भसंस्कार केंद्राच्‍या वतीने रविवारी आयोजित केलेल्या स्‍नेहमेळाव्‍याचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांच्या हस्‍ते करण्यात आले. प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्‍या सुनंदादीदी, सरितादीदी, ज्‍येष्ठ लेखिका प्रतिभा शाहु मोडक, कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटातील अभिनेत्री समिधा गुरु, युवा कलाकार ऋजुता देशमुख, स्नेहा चव्हाण, एकपात्री कलाकार मकरंद टिल्‍लू, एव्हरेस्टवीर छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक ॲड. उमेश झिरपे, डॉ. अनिल गुगळे आदी उपस्थित होते.
'पापा कहते है बडा नाम करेगा' या थिमवर सादर केलेल्‍या या कार्यक्रमात उद्योग, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍या पित्‍यांचा सत्‍कार त्‍यांच्या मुला-मुलींच्या हस्ते करण्यात आला. 

डॉ. सलिल कुलकर्णी पुढे म्‍हणाले की, सगळया मुलांसाठी आपला बाबाच सुपर हिरो असतो. तो सुपर व्‍हिलन होता कामा नये. 'शहाणी' माणसं तयार करताना 'चांगली' माणसं दुर्लक्षित होतात. चित्रातील गंमत सांगण्याऐवजी त्याची किंमत सांगणारे आपल्‍या पुढच्या पिढीवर कसे संस्कार करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुलांच्या प्रश्नांची ९० टक्‍के पालकांकडे उत्तरेच नसतात. मुलांना मॉलमध्ये नेऊन त्यांच्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी त्‍यांच्याबरोबर वेळ खर्च करा. मुलांशी मूल होऊन जगा. 

आई-वडील आणि मुलं एकत्रित राहणे आणि हसणे हे जगातील सर्वात आनंददायी आणि सुंदर चित्र आहे. आपणही सुमार बुध्दीचे आणि खट्‌याळ होतो, हे आईबाबांनी विसरू नये. अनुवंषिकतेप्रमाणे चांगले-वाईट गुण मुलांमध्ये येतात. त्‍यातील वाईट गुण कमी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्‍या मुलांना उच्च श्रेणीत ढकलण्याच्या स्पर्धेमध्ये आजच्या पिढीतील आई बाबा वात्‍सल्‍यपूर्ण आनंदी जीवन जगणेच विसरून जात आहेत. जशी प्रत्‍येक फुलांची फुलण्याची वेळ निसर्ग नियमावर अवलंबून असते, त्‍याच प्रमाणे प्रत्‍येक मुलाची घडण्याची वेळ वेगवेगळी असते. मुलांना वाढविताना आपल्‍याला पुन्हा बालपण अनुभवण्याची संधी मिळते, असेही कुलकर्णी म्‍हणाले.

या कार्यक्रमात डॉ. मंगलमूर्ती भालेराव - निरज भालेराव, ॲड. उमेश झिरपे, मकरंद टिल्लू - हर्षदा टिल्लू, अमोल गांधी - नितीन गांधी, अविनाश देशमुख - ऋजुता देशमुख, अनिल चव्हाण - स्नेहा चव्हाण, मनोज धोका - पृथ्वीराज धोका, संत्येद्र शुक्ला- रिया शुक्ला, विजय जकातदार - पल्लवी जकातदार, राणे या पित्‍यांचा गौरव करण्यात आला.

उद्‌घाटक शांतीलाल मुथा मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, चंगळवादाकडे वाटचाल करणाऱ्या समाजामुळे टीव्‍ही, फोन या आधुनिक उपकरणांचे अल्‍पवयात आकर्षण वाढू लागले आहे. त्‍यामुळे व्यभिचार, अत्‍याचारामध्ये वाढ होत आहे. कुटुंबप्रधान देशातील कुटुंब व्‍यवस्थाच यामुळे उद्‌ध्वस्‍त झाली आहे. एकत्रित कुटुंब पध्दतीने नव्या पिढीत संस्कारमूल्‍य रुजवून यावर मात करता येईल, असेही मुथा म्‍हणाले. 

प्रास्तविकात डॉ. सुप्रिया गुगळे यांनी गर्भसंस्काराची गरज असल्याची माहिती दिली. नवकार मंत्राने सिमा मुनोत, स्वप्नाली गुगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रियो, टिटो आणि साहिल या चिमुकल्‍यांनी गणेशवंदना सादर केली. तन्वी गुगळे हिने बाबा ही कविता सादर केली. सूत्रसंचालन राधिका चव्हाण तर आभार मनोज मुनोत यांनी मानले. 

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news