ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शहराच्या इतिहासात पहिला सिमेंटचा रस्‍ता सांगवीमध्ये

प्रभाग क्र. ३२ मध्ये राष्ट्रवादीचाच विजय होणार
मतदारांच्या डोळ्यांसमोर विकास झाल्याने राष्ट्रवादीचा विजय सुकर

पिंपरी, दि. १३ - नगरसेवक अतुल नानासाहेब शितोळे यांच्या दूरदृष्टीमुळे सांगवी परिसराचा झपाट्याने कायापालट होत आहे. शहराच्या इतिहासात पहिला सिमेंटचा रस्‍ता सांगवीमध्ये तयार केला गेला. हा रस्‍ता करताना पुढील २५ वर्षांचा विचार करून करण्यात आला.

स्पायसर कॉलेज पूल ते बँक ऑफ महाराष्ट्र हा सिमेंटचा रस्ता तयार करताना ३०० मी.मी. व्यासाची मोठी मलनिःसारण वाहिनी टाकण्यात आली. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, गॅस पाईप लाईन, इंटरनेट केबल, एलईडी लॅंम्पचे पथदिवे आदी कामे देखील पूर्ण करण्यात आली आहेत.

सांगवी परिसरातील रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांमुळे स्वच्छ प्रकाशयोजना कार्यान्वित झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या प्रभागातील वीज बिलांच्या लाखो रुपयांची दरमहा बचत होणार आहे. आता सर्व प्रभागात सुमारे ३६ कोटी रुपयांची सिमेंट रस्‍त्‍यांचे काम सुरू आहे. या प्रभागातील ७ मीटरपेक्षा सर्व मोठे रस्‍ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. 

हा परिसर वेगाने विकसित व्हावा यासाठी नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. सांगवी परिसरातील नागरिक प्रभाग क्र. ३२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अतुल नानासाहेब शितोळे यांच्यासह सुषमा राजेंद्र तनपुरे, ज्योती गणेश ढोरे, पंकज कांबळे यांना भरघोस मतांनी निवडून देतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी संपूर्ण सांगवी गावठाण परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या संपर्क साधला. यावेळी महिला भगिंनींनी उमेदवाराचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. आजच्या पदयात्रेत युवक युवतींसह महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news