ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागात पॅनेल विजयासाठी महिलांनी घेतला पुढाकार

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, शीतल काटे, अनिता संदीप काटे, कैलास कुंजीर यांनी रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीत महिला व युवतींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत होती. सर्व उमेदवारांनी प्रभागातील सोसायटी परिसरात नागरिकांशी संवाद साधला. महिला परिसरात पूर्णपणे सुरक्षित कशा राहतील यासाठी नाना काटे व नाना काटे सोशल फौंडेशनचे युवा कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न केले जातात. 

रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात कायदा व सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पिंपळे सौदागरला स्वतंत्र पोलीस चौकी नाना काटे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरु केलेली आहे. हिंजवडी येथे नोकरी करणारी प्रत्येक महिला भगिनी रात्री उशिरा घरी यतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नाना काटे यांच्याकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. याठिकाणी महिलांचे काही अंशी प्रश्न प्रलंबित आहेत तेही सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

प्रभागात अंतर्गत रस्तांवर पीएमपीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढविणे. विद्यालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविणे व मुख्य चौकात व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच महिलांसाठी आवश्यक तेथे स्वच्छता गृहाची उभारणी करणे, आदि विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. हा विश्वास लोकांपर्यत पोहचविला जात आहे. यासाठी प्रचार फेरीत महिला व युवतींची स्वत: पुढाकार घेतला होता. त्यामुळे रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागात नाना काटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल विजयी करण्यासाठी महिलांनी प्रचाराची धुरा हातात घेतलेली पहावयास मिळत होती.

प्रभागात विरोधी गटाचे तीन पॅनेलमध्ये विभाजन झाले आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला नक्कीच होणार आहे. विरोधी पक्षातील बहुतांश उमेदवार राष्ट्रवादीतून गेलेले आहेत. त्यांनी निष्ठावांताना डावलत आयारामांवरच तिकिटांची खैरात केली आहे. त्यामुळे निष्ठावंत पक्षापासून पासून दुरावले आहेत, हे भाजपला परवडणारे नाही. केंद्रात व राज्यात भाजप सरकारने पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची फसवणूकच केली आहे. येथील मतदार कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही. 

परिसरात झालेल्या विकास कामाबरोबर पुढील पाच वर्षात प्रभागाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे. तसेच विकासाची गंगा तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादीलाच साथ द्यावी असे आवाहन नाना काटे प्रचारा दरम्यान नागरिकांना करत होते.  

प्रचाराची धुरा महिलांनी हातात घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रभागात जोर वाढविला आहे. प्रचारफेरी व गाठीभेटी दरम्यान मतदारांना घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत असे आवाहन करताना महिलांनी पुढाकार घेतला आहे. या आवाहनास सर्व सोसायट्यांमधून व सामान्य जनतेकडून वाढता प्रतिसाद पाहता रहाटणी-पिंपळे सौदागर मध्ये 'घड्याळाची’ टीक टीक वाढलेली दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच पुन्हा बाजी मारणार अशी जोरदार चर्चा प्रभागात सुरु आहे. मागील दहा वर्षांपासून केलेल्या विकासकामांमुळे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांना मोठा जनधार आहे.

महिलांसाठी स्वतंत्र जनसंपर्क़ कार्यालय उभारणार
निवडणुकीत प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी दोन महिला उमेदवार विद्यमान नगरसेविका शितल नाना काटे व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनिता संदिप काटे उभ्या आहेत. प्रभागातील महिलांच्या वैयक्तीक अडीअडचणी जाणून घेणे व त्याच तत्परतेने सोडविण्यासाठी स्वतंत्र महिला जनसंपर्क कार्यालय उभारणार अशी ग्वाही त्या प्रचारात महिलांना देत होत्या.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news