ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अशोक चव्हाण यांची शुक्रवारी पिंपळे निलख मध्ये सभा

पिंपरी, दि. १६ - काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त माजी मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पिंपळे निलख येथे गणपती चौक, विशाल नगर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्‍हा काँग्रेसचे अध्यक्ष व प्रभाग क्र. 26 चे उमेदवार सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगारवाल   मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे. 

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news