ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दिनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी काँग्रेसला मत द्या - रझा मुराद

पिंपरी, दि. १७ - काँग्रेस पक्षाला १२५ वर्षांची विचारांची परंपरा आहे. माजी पंतप्रधान स्व. पंडित नेहरू, लालबहादुर शास्‍त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी दिनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्‍यांच्या विचाराच्या प्रेरणेवरच काँग्रेस पक्ष कार्य करीत आला आहे. काँग्रेस ही एक विचारधारा आहे. ही विचारधारा तळागाळापर्यंत पोहचली आहे. म्हणूनच आजही काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग समाजामध्ये आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन प्रसिध्द सिनेअभिनेते रझा मुराद यांनी नागरिकांना मोहननगर येथील कोपरा सभेत केले.  

यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगारवाल, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी आदी उपस्थित होते. 

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news