ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात २९५ जणांनी केले रक्तदान

पिंपरी, दि. २८ - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी खासदार स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या या शिबिराचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डिन प्रा. शितलकुमार रवंदळे, विद्यार्थी विकास व कौशल्य अधिकारी डॉ. शितल भंडारी आदी प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते. शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण २९५ जणांनी रक्तदान केले. 

यावेळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीतील डॉ. शंकर मुसलघे आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रा. निखिल सुरवाडे, प्रा. केतन देसले आणि विद्यार्थी प्रतिनिधी शुभदा पडवळ, दिलीप आडे यांनी संयोजनात सहभाग घेतला.