ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जागतिक महिला दिनानिमित्त सायबर क्राईमवर डॉ. डीकोस्टा यांचे व्याख्यान

पिंपरी, दि. ६ - जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व पिंपरी चिंचवड वुमन्स सोशल वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ८ मार्च २०१७) सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेराल्ड डीकोस्टा यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य समन्वयक व शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे

चिंचवड येथील ॲटो क्लस्टरच्या समोर सायन्स पार्कच्या हॉलमध्ये बुधवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी ‘मिडीया तंत्रज्ञानातील आपली सुरक्षितता व सावधानता कशी घ्यावी’ या विषयावर सायबर सुरक्षा तज्ञ डॉ. हेराल्ड डिकोस्टा हे मार्गदर्शन करतील. यावेळी मंजू लोहोट (राक्षे), नेहा नाणेकर, दिपाली जाधव, स्नेहल बांगर, संजीवनी मेहरकर, सुनिता आल्हाट, शुभांगी केदार, ज्योती हजारे, रेखा चोपडे, वैशाली आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत.