ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खंडीत वीज पुरवठ्यामुळे पिंपळे गुरववासीय त्रस्त

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिंपळे गुरववासीय त्रस्त झाले असून, नागरीकांनी आंदोलन करण्याचा इशारा 'महावितरण’ला दिला आहे.

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, तसेच आजुबाजूच्या परिसरात ऐन उन्हाळ्याच्या झळा सुरू असताना वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे या भागातील रहिवासी, नागरिक त्रस्त झाले आहेत. 'महावितरण’च्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना उष्म्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर उद्या-परवा दहावीच्या परिक्षाही सुरू होणार आहेत. मात्र, खंडीत वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण होत आहे.

कधी दिवसा, तर कधी रात्रीच्या वेळेस ही वीज गुल होत असल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहत आहेत. पिंपळे गुरव आणि आजुबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी अद्यापही भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम झाले नसल्यामुळे नागरिकांच्या घरासमोरच उघड्यावरच वीजवाहिन्यांचा गुंता दिसून येतो. या उघड्या वीजवाहिन्यांमुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ’महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्याप त्याची दखल घेतली जात नसून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. लवकरात लवकर खंडीत वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.