ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ओएलएक्सवर खोटी जाहिरात देऊन साडेपाच लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ९ - ओएलएक्सवर चारचाकी गाडी विक्रीची खोटी जाहिरात टाकून एका महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संतोष कुमार सिंग (उत्तर प्रदेश), खोरा पुई (दिल्ली), कृष्णाप्पा पी याच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरजा मेहरा (रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज मेहरा यांना नवीन चारचाकी गाडी घ्यायची होती. त्यांनी ‘ओएलएक्स’वर इनोव्हा गाडीची जाहिरात पाहिली. त्यातील माहितीत उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. नीरज आणि जाहिरात देणाऱ्या व्यक्तीमध्ये इनोव्हा गाडी विक्रीबाबत साडेपाच लाख रुपयांत व्यवहार झाला. 

जाहिरातदाराने गाडी विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून, त्यांना ३२ हजार रुपये देऊन ती सोडवून घ्या, असे दूरध्वनीवरून सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नीरज यांनी बोगस सीमा शुल्क अधिकारी संतोष कुमार सिंग याच्या खात्यावर २० सप्टेंबरला ३२ हजार रुपये जमा केले. विशेष म्हणजे पैसे जमा केल्याची पावती मेलद्वारेही पाठवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन जा, असे सांगण्यात आले. मात्र, ओएलएक्सवर जाहिरात देणाऱ्या व्यक्तीने पुन्हा फोन केला. माझी पत्नी आजारी असून मला पैशांची गरज आहे, असे नीरज यांना सांगितले. त्यामुळे नीरज यांनी खोरो पुई याच्या बँक खात्यात २१ सप्टेंबर २०१६ रोजी तब्बल ५ लाख १५ हजार रुपये जमा केले. 

त्यानंतर विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून गाडी घेण्यासाठी नीरज तेथे गेले. परंतु, विमानतळावर अशा नावाचे कुणी सीमा शुल्क अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे नीरज यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.