ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

पिंपरी, दि. ९ - वाकड येथे सुरु असलेल्या एका बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही  घटना शनिवारी (दि.४) दुपारी कस्पटे वस्ती येथे घडली.

उमेश कोदू ध्रुव (वय २८, रा. लेबर कॅम्प, वाकड), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार दीपक मल्लेश यलाफुल्ला यादव आणि जे. के. असोसिएट्स कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश याची पत्नी लक्ष्मी उमेश ध्रुव (वय २३) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड येथील कस्पटे वस्तीमध्ये जे. के. असोसिएटस् कन्स्ट्रक्शनची बांधकाम साईट सुरु आहे. शनिवारी उमेश हा सहाव्या मजल्यावर डस्टरचे काम करत होता. काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या साईटवरील ठेकेदार यादव याने कामगारांच्या सुरेक्षीततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याने ही घटना घडली असल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.