ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काचबिंदूमुळे दृष्टी कमजोर होऊन अंधत्व येते - डॉ. पाहूजा

पिंपरी, दि. १७ - जगभरातील सुमारे साठ दशलक्ष लोकांना काचबिंदूचा (ग्लॉकोमा) त्रास होतो. यापैकी ११.२ दशलक्ष रुग्ण भारतीय उपखंडातील आहेत. काचबिंदू (ग्लॉकोमा) मुळे माणसाची दृष्टी कमजोर होते व अंधत्व येते. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा तज्ज्ञ नेत्र चिकित्सकाकडून तपासणी करुन घ्यावी असे आवाहन ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. किशोर पाहुजा यांनी केले.

काचबिंदू विषयी नागरीकांना माहिती देण्यासाठी १२ मार्च ते १८ मार्च या कालावधीत जगभर ‘ग्लॉकोमा जनजागृती सप्ताह’ पाळला जातो. या अंतर्गत पिंपळे सौदागर येथील ‘नताशा आय केअर ॲण्ड रिसर्च सेंटरच्या’ वतीने पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि पिंपरी गाव व कॅंम्प परिसरातून सायकल फेरी काढण्यात आली. 

यावेळी काचबिंदू या आजाराविषयी माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. डॉ. किशोर पाहुजा यांनी सांगितले की, भारतात सुमारे साठ लाख लोकांना काचबिंदू आहे आणि त्याहून जास्त लोकांना स्वत:ला काचबिंदू असल्याचे भान देखील नसते. यामुळे डोळ्यांच्या आतमध्ये दाब वाढून दृष्टी अंधूक होते आणि उपचार न मिळाल्यास काचबिंदू मुळे अंधत्व येते. 

चाळीस वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींना जर दृष्टी अंधूक वाटत असेल तर, डोळ्यात वेदना आणि डोकेदुखी होते असेल तर, प्रकाशाभोवती रंगीत वर्तुळे दिसत असतील तर, वाचण्याच्या चष्म्याचा नंबर सारखा बदलत असेल तर, सर्व समावेशक नेत्र तपासणी करुन घ्यावी. अनुवंशिकता, मधुमेह, उच्चं व कमी रक्तदाब, कंठग्रंथीचा आजार असणारे व्यक्तींना आणि नियमित स्टेरॉईड, कॉर्टिसोनचे सेवन करणा-या व्यक्तींना काचबिंदू होण्याची जास्त शक्यता असते. 

काचबिंदू असलेल्या लोकांनी डोळ्यातील दाब नियमित तपासून घ्यावा व नियमित औषधे घेणे आवश्यक आहे. काचबिंदूचे निदान सुरुवातीच्याच टप्यात झाल्यास त्वरित उपचार करुन अंधत्व टाळता येत असल्याचेही डॉ. किशोर पाहूजा यांनी सांगितले.