ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीआरटीएस मार्ग आजपासून दुचाकींसाठी खुला

चिंचवड , दि. २० - वाहतुकीची गैरसोय लक्षात घेता निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग आज सोमवार (दि. २०) पासून दुचाकींसाठी खुला करण्यात आला आहे.  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शिफारशीनंतर हा मार्ग आजपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर आज अनेक दुचाकी धावताना पाहावयास मिळाल्या.
निगडी-दापोडी बीआरटीएस मार्ग हा तीन वर्षापासून बांधला गेला असला तरी मार्गावरील बस थांब्याची दुरावस्था, तसेच मार्ग बांधणीचा अंदाज चुकणे आदी अडचणींमुळे आत्तापर्यंत रखडला आहे. त्यामुळे शहराच्या मधोमध असणारा तयार रस्ता वापरात नव्हता.
मात्र, या मार्गावर दुचाकी नाही तर बीआरटीएस बसच धावावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे करण्यात आली आहे. निगडी-दापोडी हा मार्ग गेल्या तीनवर्षापासून तयार आहे. मात्र नियोजनाचा अभाव, दुरुस्तीची कामे यामुळे तो रखडला आहे. आयुक्त दिनेश वाघमांरे यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची धुरा सांभाळताच तो  डिसेंबर २०१६ ला चालू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, मार्गाच्या फाईलच वेळी पुढे न सरकणे, राजकीय विरोध अशा अनेक बाबीत हा मार्ग तयार असूनही वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे.
आज जरी दुचाकी चालू झाल्या असल्या तरी अनेक नागरिकांना बीआरटीएस बसच या मार्गावरून धावली पाहिजे, असा आग्रह आहे. कारण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीला आणण्यापेक्षा ती सक्षम बनवणे गरजेचे आहे. प्रशासनाने मात्र, ही तात्पूर्ती उपाय योजनाअसून या मार्गावरून बीअरटीएसच धावेल, असे सांगितले आहे.