ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सतीश शेट्टी यांच्या सुरक्षाअर्जावर दिरंगाई, पोलीस खात्याला १५ लाखांचा दंड

तळेगाव दाभाडे, दि. २५ - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या सुरक्षाअर्जावर कार्यवाहीस दिरंगाई केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मुंबई मानवाधिकार आयोगाने पोलीस खात्याला १५ लाख रुपयांचा दंड सुनावला असून दंडाची रक्कम त्वरित शेट्टी कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेचे कार्याध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी १५ जानेवारी २०१० ला मुंबई मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करून मानवाधिकार आयोगाने काल (गुरुवारी) वरील निर्णय दिला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिका-यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
सतीश शेट्टी यांचा १३ जानेवारी २०१०  रोजी तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. १३ जानेवारीच्या काही दिवस अगोदर शेट्टी यांनी जीवितास धोका असल्याने सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पुणे ग्रामीण पोलिसांकडे केला होता. मात्र, तत्कालीन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनाथ पोकले, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांच्या सुरक्षेच्या अर्जावर गांभीर्याने निर्णय घेतला नाही, असे आयोगाने म्हटले आहे.
तत्कालीन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनाथ पोकले, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावर मानवाधिकार आयोगाने ठपका ठेवला असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही  करण्याचे आदेश दिले आहेत. दिलीप शिंदे हे सेवानिवृत्त झाले आहेत. तर, रामनाथ पोकले हे पुणे सीआईडीला अधीक्षक पदावर असून श्रीकृष्ण कोकाटे हे मुंबईत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.
आयोगाने तत्कालीन पुणे ग्रामीण पोलिसांवर ताशेरे ओढले. शेट्टी यांच्या अर्जावर गांभीर्याने निर्णय घेतला नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलीस खात्याने दंडाची रक्कम त्वरित शेट्टी कुटुंबीयांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.