ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टाटा मोटर्स कामगारांना त्रैवार्षिक वेतनवाढ

चिंचवड, दि. २९ - टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये काल (मंगळवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. हा वेतनवाढ करार जवळजवळ १९ महिने प्रलंबित होता.
सतिश बोरवणकर, कार्यकारी संचालक (क्वालिटी) जे टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन कराराबाबतची युनियनबरोबर चर्चा करून कराराबाबत लवकरात लवकर निर्णय दिला.
दिनांक १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीकरिता रु. ८६००/- प्रत्यक्ष वाढही तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून तसेच रु. ८७००/- अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७३००/- एवढ्या रकमेचा करार झाला.
या पगारवाढी व्यतिरिक्त कंपनीने कंपनीच्या सेवेत असताना एखादा कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना मिळणा-या ग्रॅच्युइटीबाबत, 25 वर्षसेवा काल पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येईल. या वाढीबरोबरच कामगारांना देण्यात येणा-या इतरही सेवा सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्लॉक क्लोजरच्या दिवसांमध्येही ६ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच कार्यप्रणालीच्या मोजमापनाशी संलग्न पगारवाढ यास कामगारांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.
बोरवणकर यांनी कामगार व युनियनसोबत कंपनीचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असल्याचेही नमूद केले. सर्वांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. कामगारांनी जवळजवळ १९ महिने शांततेच्या मार्गावर राहिल्याबद्दल कौतुक केले व युनियनने सुद्धा इतक्या चांगल्या मार्गाचा अवलंब करून कामगारांना जास्तीत जास्त फायदा करून दिल्याचा उल्लेख केला. टाटा संस्कृती आपण सर्वांनीच अशाच प्रकारे जपली पाहिजे, याबाबत त्यांनी उल्लेख केला.