ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

थेरगावमध्ये ५०० विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

थेरगाव, दि. ३१ - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आशाकिरण सोशल फाऊंडेशनच्या वतीने आज थेरगावमधील  महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले.
थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात आज सकाळी आठ वाजता सूर्यनमस्काराची जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक कैलास बारणे, शाळेचे पर्यवेक्षक चंद्रशेखर कदम, क्रीडा भारतीचे शेखर कुलकर्णी, योग प्रशिक्षक माया चत्तुर,  गीतांजली देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले,  सूर्यनमस्कार घातल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. आकलन क्षमता वाढते. बुद्धी वाढण्यास मदत होते. मनाची एकाग्रता वाढते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेण्यास विसरत आहे.  तसे न करता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
नगरसेवक कैलास बारणे म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांची बुद्धीक्षमता वाढावी यासाठी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करावा.  जूनपासून या योगाची सुरुवात करावी. सध्या परिक्षांचा काळ  असल्याने जूनमध्ये सूर्यनमस्कार घालण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिली.
यावेळी गीता देशपांडे व माया चत्तुर यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना यावेळी करुन दाखविले. शेखर कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण पालमकर यांनी केले. सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी केले.