ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अनुदान थकल्याने प्रवेश बंद ठेवण्याचा खासगी शाळांचा पवित्रा

चिंचवड, दि. ५ - शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे गेल्या चार वर्षांपासूनचे तब्बल ३५० कोटींचे अनुदान राज्य सरकारकडे थकल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शिक्षण संस्थाचालकांनी १ एप्रिल पासून प्रवेशप्रकिया बंद केली आहे.
याबाबत खासगी शाळा संस्थाचालकांनी आज (बुधवारी) शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे यांची भेट घेतली. यावेळी इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल असोशिएशनच्या अध्यक्षा जागृती धर्माधिकारी, सचिव राजेंद्र सिंग, पदाधिकारी ओम शर्मा, राजीव मेंदीरट्टा आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका शेत्रातील सर्व खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार गेल्या चार वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राज्य सरकारने आम्हाला दरवर्षी अनुदान देणे गरजेचे आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रवेश दिलेले ३५० कोटींचे अनुदान राज्य सरकारकडे थकले आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आल्याची कैफियत शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षण मंडळाच्या सभापतींकडे व्यक्त केली.
तसेच आरटीई नियमानुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेने पात्र ठरविण्यात आलेल्या २०१७-१८ या वर्षासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला आहे. याबाबत आम्ही शिक्षण मंत्र्यांना, शिक्षण अधिका-यांना वारंवार भेटलो आहोत. त्यांच्याकडे पाठपुराव करत असून त्यासाठी आंदोलन देखील केले असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले.
शिक्षण मंत्र्याकडून वेळोवेळी अनुदान देतो, असेच आश्वासन मिळाले आहे. आश्वासन देऊनही अनुदान दिले नसल्यामुळे आम्ही आक्रमक झालो आहोत. कसल्याही परस्थितीत अनुदान मिळाल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याचे, संस्थाचालकांनी सांगितले.
याबाबत शिक्षण मंडळाचे सभापती निवृती शिंदे म्हणाले, संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना वेठिस धरु नये. आरटीईमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत. अनुदान देण्यासाठी शिक्षण मंडळ राज्य सरकारकडे मध्यस्थी करणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र देखील दिले आहे. तसचे शहरातील आमदार लक्ष्णम जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांना देखील याबाबात पत्र दिले आहे.