ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पवना नदीच्या पाण्यात पाय सुद्धा धुवू वाटत नाही - गिरिश प्रभुणे

चिंचवड, दि. १५ - पवना नदीचे पात्र पूर्वी स्वच्छ होते. जलपर्णी नव्हती. नागरिक नदीचे पाणी प्राशन करत होते. आता मात्र नदीच्या पाण्यात पाय सुद्धा धुवू वाटत नाहीत. एवढी नदीची गटारगंगा झाली आहे. पवना नदी वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे अशी खंत चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिश प्रभुणे व्यक्त केली.

आपले चिंचवड व्यासपीठच्या पुढाकाराने संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलुया वाटा खारीचा' या संकल्पनेतून  'नमामि पवनामाई' अभियानाला शुक्रवार (दि.१४) पासून सुरुवात झाली. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. यावेळी विघ्नहरी देव महाराज, विद्या विघ्नहरी देव, खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजाजन चिंचवडे, राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कृष्णाजी जगताप, संस्कृती संवर्धनचे अजित जगताप, मीना पोकर्णा, सुरेखा कटारिया, आशा काळे आदी उपस्थित होते. 

आपले चिंचवड व्यासपीठाने 'नमामि पवनामाई' अभियान सुरु केल्याने पवना नदीचे पात्र स्वच्छ होईल असे सांगत प्रभुणे पुढे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन पवना स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनानेदेखील याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पंरतु, नागरिकांनी महापालिकेवरही अवलंबून राहू नये. पवना वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

विघ्नहरी देव महाराज म्हणाले, चिंचवडगावाला ऐतिहासिक, धार्मिक महत्व आहे. पवना नदीचे पात्र स्वच्छ राहिले पाहिजे. आपले व्यासपीठने  'नमामि पवनामाई' सुरु केलेले अभियान कौतुकास्पद आहे. सामाजिक चळवळीतून सर्वांनी एकत्र येऊन पवना नदीचे पात्र स्वच्छ करावे. 

दरम्यान, ''आपले पवनाकाठचे चिंचवड शहर ते महानगर' या विषयावर गिरिश प्रभुणे आणि मधू जोशी यांची राजेंद्र घावटे यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

संत तुकाराम महाराज मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पवना नदीकाठी वसलेल्या चिंचवडगावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. पूर्वीचे वाडे, चाळी, वड, चिंचेची झाडे चिंचवडगावची मुख्य वैशिष्टये होती. तिर्थक्षेत्राला साजेशे असे चिंचवडगाव होते. चिंचवडमध्ये चतुर्थीला भरणारी यात्रा पाहण्यासारखी होती. यात्रेचे शहराला आकर्षण असायचे. शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत होत्या, अशा विविध जुन्या आठवणींनाही प्रभुणे यांनी उजाळा दिला

मधू जोशी म्हणाले की, पूर्वीचे चिंचवड रम्य होते. धूळ होती, पण ती धूळ हवी-हवीशी वाटत होती. वडाची, चिंचेची झाडे खूप होती. नगरपालिकेची नळाची योजना अस्तित्वात नव्हती त्यावेळी गावातील लोक याच पवना नदीचे पाणी पित होते. त्यावेळच्या नागरिकांमध्ये मतभेद होते. परंतु, मनभेद नव्हते. खुनशीपणा नव्हता. आत्ता पुर्णपणे बदल झाला आहे. वाडे, चाळीच्या जागी सिमेंटची जंगली झाली आहेत. 

यावेळी  सुभाष चव्हाण यांनी ''पिंपरी-चिंचवड शहर उद्योगाचे माहेरघर'' हा पोवाडा सादर केला

विघ्नहरी देव Posted On: 15 April 2017