ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पेट्रोलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढला

चिंचवड, दि. २२ - राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलीटर तीन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साध्या पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवेक्ते अली दारुवाला यांनी सांगितले. नवीन दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. 

दारुवाला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर दारू विक्री करण्यास मनाई केली आहे. यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी पेट्रोलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत साध्या पेट्रोलचे दर ७१.५७, स्पीड पेट्रोलचा दर ७४.०३ रुपये इतका होता. तर डिझेलच्या दरामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. केवळ पेट्रोलवरील व्हॅट वाढल्यामुळे शहरात आजपासून साधे पेट्रोलचे दर .७८ रुपये तर स्पीड पेट्रोलचे दर .७७ रुपयांनी वाढले आहेत.