ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सर्वपक्षियांच्या ''आश्वासनांची आठवण' उपोषणाला सुरुवात

चिंचवड, दि. २६ - लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षियांच्या  ''आश्वसनांची आठवण' उपोषणाला आज (बुधवारी) सकाळपासून सुरुवात झाली आहे. चिंचवड स्टेशन येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय अधिवेषनालाही सुरुवात झाली आहे.

चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून 'आश्वसनांची आठवण' उपोषणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, माजी महापौर नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, विनया तापकीर, पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुती भापकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फजल शेख, विजय लोखंडे, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआएमचे शब्बीर शेक, आरपीआय (कवाडे) गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरेश मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव, माकपचे अमित कांबळे, गणेश दराडे, आनंदा यादव, तानाजी खाडे उपोषणाला बसले आहेत.  भाजपची बैठक संपेपर्यंत उपोषण करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या निर्णयाबाबत स्पष्टता यावी, सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, मराठी, मुस्लिम धनगर समाजाला आरक्षण मिळावे, शहरातील गोरगरीबांना किमान शासकीय महापालिकेच्या योजनेअंतर्गत किमान ५०० चौरसफुटांची घरे मिळावीत, न्यायालयात जाऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींना घरांपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी त्याबाबत जाहीर खुलासा करावा, या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे
.