ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

... आता ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा – मुंडे

चिंचवड, दि. २८ - शेतक-यांचा सातबारा कोरा करू, कर्जमुक्त करणार अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे सांगत सरकारवर खूनाचा गुन्हा दाखल करा, असे सांगत होते. भाजपच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या जास्त झाल्या असून आता कोणावर खूनाचा गुन्हा दाखल करायचा असा सवाल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला 

भाजपची दोन दिवसीय कार्यकारिणी परिषद चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. यानिमित्त विरोधी पक्षांनी तसेच सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन राज्यातील प्रलंबित प्रश्नांचे सरकारला आकलन करून देण्यासाठी शिवसेनेचे मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन चौकात दोन दिवसीय आंदोलन केले. या आंदोलनाची सांगता करताना विधानपरिषधेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, विजय लोखंडे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, विरोधी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संस्था, संघटनांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. 

अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, शेतकरी कर्ज मुक्ती, सातबारा कोरा करणे, मराठा-धनगर-मुस्लीम आरक्षण असे अनेक प्रश् सोडविण्याचा शब्द देणारे बोलघेवडे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत. अनधिकृत बांधकामांचा प्रश् सोडविण्यात आल्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली. परंतु, त्याची अंमलबजावनी करता पिंपरी-चिंचवडकरांचा विश्वासघात केला. तरीही, चिंचवडमध्ये भाजपची कार्यकिरणी घेऊन पेढे वाटप केले, असे धनंजय मुंडे म्हणाले