ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिलांविषयीची मानसिकता बदलली तर समाज बदलेल - विजया रहाटकर

चिंचवड, दि. २८ - महिलांवरील अन्यायाची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. महिला सुरक्षित नसल्याचा आवाज सर्व स्तरांमधून उठत आहे. -या अर्थाने महिलांना सक्षम आणि सबल करावयाचे असेल तर समाजाची महिलांबाबतची मानसिकता प्रथम बदलायला हवी, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मांडले. 

चापेकर चौक, चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक उद्यान येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना 'महिला सुरक्षा, स्वातंत्र्य सबलीकरण' या विषयावर विजया रहाटकर बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेविका उमा खापरे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा शैलजा मोळक, प्रा. नीता मोहिते, अंतरा देशपांडे, प्रा. नामदेवराव जाधव, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे आणि मंडळाचे सचिव गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. 

विजया रहाटकर म्हणाल्या की, निसर्गाने स्त्रीला सृजनशक्ती बहाल केलेली आहे. भारतात किंबहुना जगात स्त्री ही आपल्या कुटुंबाचा कणा असते. प्राचीन काळापासून दैदिप्यमान महिलांचा आपल्या देशाला वारसा लाभलेला आहे. अशी सर्व स्तरावर उत्तम परिस्थिती असताना खरोखरच महिला सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचा शोध घेतला; तर त्याचे उत्तर नकारात्मक येते. अगदी गर्भात असल्यापासून ती तपासली जाते; आणि भ्रूणहत्या करून नष्ट केली जाते. बाप, भाऊ, प्रियकर, नवरा अशा सर्व पुरुषी नात्यांकडून ती वापरली जाते. आपल्या समाजातील पुरुषी मानसिकतेच्या वर्चस्वामुळे घर ते समाज अशा सर्व ठिकाणी तिचे शोषण होताना दिसते. वरकरणी स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी प्रत्यक्षात कुटुंबात मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. त्यामुळे आचार-विचार- विहार -शिक्षण या सर्व बाबतीत स्त्री-पुरुष भेद केला जातो. अगदी घरगुती हिंसाचारापासून ते सामूहिक बलात्कारापर्यंत अनेक अत्याचारांना स्त्रीला तोंड द्यावे लागते. वास्तविक गर्भलिंगनिदान बंदी, हुंडाबंदी, लैंगिक संरक्षण असे अनेक कायदे अस्तित्वात आहेत. याशिवाय निर्भया किंवा अरुणा शानभाग यांसारख्या प्रकरणांमधून प्रचलित कायद्यातील त्रुटी दूर करून ते अधिक व्यापक केले आहेत. 

सातच्या आत घरात हे महिलांसाठीच का

शिक्षण, क्रीडा, अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांसारख्या सर्व क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असताना देखील सातच्या आत घरात यांसारखे नियम केवळ महिलांसाठीच का ? असा प्रश्न व्याख्यानमालेत बोलताना विजया रहाटकर यांनी उपस्थित केला. स्त्री ही माणूस आहे, हे मूल्यशिक्षण घराघरातून दिल्याशिवाय महिला ते सुपर वूमन हा प्रवास सफल होणार नाही.