ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भावनाशील लोकांना पुतळे हवेत, मूलभूत सुविधा नकोत - असीम सरोदे

चिंचवड, दि. २९ - आज शिवाजी महाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वतःच विरोध केला असता. परंतु इथल्या भावनाशील लोकांना मूलभूत सुविधांऐवजी पुतळे हवे आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केलेचापेकर चौक, चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक उद्यान येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प गुंफताना 'नागरिक शास्त्राचे पर्यावरण'  या विषयावर असीम सरोदे बोलत होते 

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार अध्यक्षस्थानी होते, तसेच बाळासाहेब मरळ, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, मंडळाचे सचिव गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार आदी उपस्थित होते 

असीम सरोदे म्हणाले पुढे म्हणाले की, नुसते उंच झेंडे लावले आणि करोडो रुपये उधळून पुतळे उभारले, की सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात कोणता फरक पडतो? परंतु असा प्रश्न विचारण्याची कोणी हिंमत करू शकत नाही. असे प्रश्न विचारणा-यांचा सतीश शेट्टी, दाभोळकर, पानसरे केला जातो. हजारो कोटी रुपये खर्चून सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारला जातो; कारण इथल्या भावनाशील लोकांना पुतळे हवेत, मूलभूत सुविधा नकोत, हे राजकीय पक्षांनी केव्हाच ओळखले आहे. 

 'अतुलनीय भारत' यासारख्या फसव्या जाहिराती केल्या जातात. नागरिकांकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशातून मोठे बॅनर लावले जातात; पण अशा प्रतिकात्मक पद्धतीने देशप्रेम व्यक्त केल्याने लोकशाही सुदृढ होत नाही किंवा समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचत नाही. ज्या देशांमध्ये देव आणि धर्म रस्त्यावर आणले जातात, ते देश जगात मागासलेले आहेत. लोकशाहीत नागरिकशास्त्राचे खूप महत्त्व आहे. लोकांचे हक्क, कर्तव्ये आणि जबाबदा-या स्पष्ट करणारा हा समाजशास्त्रीय विषय आहे. नागरिकशास्त्राचे पर्यावरण म्हणजे सामान्य नागरिक हा जागरूक, सक्रिय झाला पाहिजे. राजकीय पक्ष आपले हेतू साध्य करण्यासाठी मोर्चे, आंदोलने करून विध्वंसक कारवाया करतात; आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात. अशावेळी ठाम भूमिका घेऊन प्रश्न विचारले पाहिजेत Posted On: 29 April 2017