ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

परिसरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

चिंचवड, दि.. ५ - पावसाळा सुरू होण्या अगोदरच पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होणार आहेत. ३१ मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेशच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिले आहेतआरोग्य विभाग सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांची आयुक्त हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) आढावा बैठक घेतली. त्यावेळी नालेसफाईची कामे करण्याचे आदेश त्यांनी दिले.

यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, चंद्रकात खोसे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदीप खोत यांच्यासह सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी मलेरिया डेंग्यूसह संसर्गजन्य रोगांची लागण रोखण्यासाठी गप्पी मासे पाण्यात सोडण्यात यावेत. पावसाळ्यापूर्वी कर्मचा-यांमार्फत कंटेनर सर्वे करावा. घरोघरी जाऊन याबाबत जनजागृती करावी, अशा सूचनाही आयुक्त हर्डीकर यांनी अधिका-यांना केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १९२ नाले आहेत. त्यामध्ये '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४२ नाले असून त्यापैकी २९ नाल्यांची साफसफाई महापालिका कर्मचा-यांकडून करण्यात येत आहे. '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३० नाले तर '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४० नाले आहेत. '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १४ नाले, '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३२ नाले तर '' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३४ नाले आहेत. या सर्व नाल्यांची साफसफाई ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे, आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिले आहेत.