ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मार्ट सिटीसाठी पिंपरी महापालिका एसपीव्ही स्थापन करणार

चिंचवड, दि. १० - स्मार्ट सिटीत तिस-या फेरीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या समावेशाची औपचारिकता शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात 'पॅन' सिटीचा आराखडा तयार करण्यात येईल. तसेच स्मार्ट सिटीसाठी विशेष हेतू वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल - एसपीव्ही) स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

तिस-या टप्यात पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकराच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनीच याबाबतची घोषणा केली. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाला चालना मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, आपण नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना नागपूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव आहेउशीरा का होईना पिंपरी महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असला तरी आपण जलदगतीने पुढे जावू. स्मार्ट सिटीचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नेमणुक करण्यात येणार आहे. एसपीव्ही स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सभेला दिला आहे. 

स्मार्ट सिटी योजनेत हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात विविध कामांना केंद्र सरकाराचे ५०० कोटी रुपयांचे, राज्य सरकारचे २५० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेला २५० कोटी रुपये स्वहिस्सा खर्च करावा लागणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.