ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळा येत्या बुधवारी

चिंचवड, दि. १५ - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीचा जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळा १७ मे रोजी चिंचवडला होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमर साबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर आदी उपस्थित राहणार आहे.

पिंपरीच्या ग्रॅप फायर इंडस्ट्रीजचे गजानन चरपे यांना उद्योगरत्न, भोसरीच्या एक्सलन्ट डायीड अॅण्ड मोल्डचे मोहरसिंग वर्मा यांना उद्योग विभूषण, चिखलीच्या प्रेरणा किचन रॅक्सचे प्रवीण शिंदे यांना उद्योगभूषण, भोसरीच्या डायमंड इंडस्ट्रीजचे राघवेंद्र दलाल यांना उद्योगभूषण, मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीजच्या राजश्री गागरे यांना उद्योग सखी, राज इलेक्ट्रीकल प्रॉडक्टसचे राजेश पालवे यांना उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर भोसरीच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. गुणवंत कामगार बाजीराव सातपुते यांचे जे.आर.डी. टाटा यांना अभिप्रेत असलेला २१ व्या शतकातील उद्योजक या विषयांवर व्याख्यान होईल.