ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज भरण्यासाठी नागरिकांची झुंबड

चिंचवड, दि. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच घरांसाठी नागरिकांकडून अर्जही मागविले आहेत. या योजनेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. पालिकेच्या सहा श्रेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन घर नसणा-या नागरिकांना दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत शहरातील रहिवासी असलेल्या पण स्वतःचे घर नसणा-या प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. त्याला नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या सहा श्रेत्रिय कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यास नागरिकांचा प्रचंद प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या सहा श्रेत्रिय कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज  भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. निगडी, प्राधिकरण येथील '' श्रेत्रिय कार्यालयात अर्ज भरण्यास नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रात्रीपासून नागरिक अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावत आहेत. 

नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अर्ज सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांची म्हणजेच ३१ मे पर्यंत महापालिकेने मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी अर्ज करु शकतात.