ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदासाठी चुरस

चिंचवड, दि. १७ - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादीमध्ये चूरस निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही पदे रिक्त आहेत. विद्यमान नगरसेविकेलाच महिला शहराध्यक्ष आणि वय वर्ष २८ असलेल्या तरुणाकडेच युवक अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मे अखेर या दोन्ही पदांची निवड केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. २०१७ च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर शहरात पक्षसंघटना वाढविण्यासाठी पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार केरळ दौ-यावरुन परतले असल्याने लवकरच संघटनेत बदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तत्कालीन शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. तेव्हापासून महिला शहराध्यक्ष पद रिक्त आहे. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पंधरा दिवसातून एकदा पिंपरी-चिंचवड शहरात येवून महिला संघटनेची आढावा बैठक घेत आहेत. महिला संघटनेच्या कामाचा आढावा घेत आहे. महिलांचे संघटन करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. महिला शहराध्यक्षपदी विद्यमान नगरसेविकाच असावी, अशी महिला कार्यकर्तींची मागणी आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर विद्यमान नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, वैशाली काळभोर, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा गोफणे यांची नावे चर्चेत आहेत.