ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने केले परत

चिंचवड, दि. १९ - पिंपरी चिंचवडमधील देहूरोडमध्ये रिक्षावाल्याच्या प्रामाणिकतेची प्रचिती आली. रिक्षाचालक वसीम शेख यांनी प्रवासी महिलेचे साडे तीन लाखांचे दागिने परत केले आणि प्रमाणिकपणा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वसीम शेख हे देहू रोडजवळील शेलारवाडी येथील भेगडे कुटुंबीयांना एका रुग्णालयातून घेऊन निघाले होते. भेगडे यांना घरी जाण्यापूर्वी आणखी एक काम पूर्ण करायचे असल्याने त्या मध्येच उतरल्या. मात्र, त्यांच्या बॅगांपैकी सोन्याचे दागिने असणारी बॅग ते रिक्षात विसरल्या. अगदी पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वसीमची शोधमोहीम सुरु केली.

स्थानिकांच्या मदतीने भेगडे यांनी प्रत्येक रिक्षावाल्याकडे विचारपूस सुरु केली. सुदैवाने वसीम एका ठिकाणी सापडला असता त्याने भलत्याची बॅग समजून त्रयस्थ व्यक्तीला दिली होती. मात्र, प्रामाणिक वसीमला त्या व्यक्तीचा पत्ता माहित असल्याने त्याने तातडीने त्रयस्थ व्यक्तीचं घर गाठलं. बॅग घेतली आणि त्या महिलेला सुपूर्द केली. बॅग पाहताच क्षणी महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेसह स्थानिकांनी वसीमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. प्रामाणिकपणावरचा विश्वास उडावा अशा घटना आजूबाजूला घडत असताना, वसीम शेख या रिक्षावाल्याने प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचेच दाखवून दिले आहे.