ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत येतील - विलास लांडे

चिंचवड, दि. १९ -  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते जास्त काळ तिकडे राहणार नाहीत. भाजपने कोणतेही पद दिल्यास ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील असे, वक्तव्य भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केले. तसेच पक्ष संघटनेसाठी सगळ्यांनी हेवेदावे विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही, त्यांनी केले आहेचिंचवड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

विलास लांडे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या १५  वर्षापासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी शहराला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करुन दिला. तरीही, महापालिका निवडणुकीत पक्षाचा पराभाव झाला. पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जावू नये, असे. 

आपण आता विरोधात आहोत. संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उरतणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. पराभव झाला म्हणजे पक्षावर फार मोठे संकट आले आहे, असे काही नाही. पराभावाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खचून गेले नाही पाहिजे. 

उणीदुणी काढत बसण्यापेक्षा पक्षासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. याने माझ्याविरोधात काम केले, त्याने माझे तिकीट कापले असे म्हनणे सोडून देवून सगळ्यांनी पक्षासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. संघटना वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांची आणि पक्षाने तिकीट नाकारुनदेखील पक्षात राहिलेल्या पदाधिका-यांची पक्षाने बैठक घेणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणूक कधीही लागू शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन असणे गरजेचे आहे. प्रभागात जावून कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकही भरीव असा प्रकल्प दिला नाही. भाजप सरकारच्या काळात स्वच्छतेच्या बाबतीत शहराची पिछाडी झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात देशात ९ व्या तर राज्यात पिंपरी-चिंचवड शहर पहिल्या क्रमांकावर होते, असेही लांडे म्हणाले. 

बदलत्या राजकीय परस्थितीत संवाद साधण्याची गरज निर्माण झाली Posted On: 19 May 2017