ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाणी कपात करुन आळंदीला पाणी कशासाठी - नगरसेवकांचा सवाल

चिंचवड, दि. २० -  पिंपरी-चिंचवड शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी कमी दाबाने येत आहे. शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाणी कपात करुन आळंदीला पाणी कशासाठी देण्यात आले, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केले. तसेच आळंदीला पाणी देण्यास विरोध नाही. परंतु, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा. पाणी द्यायचे असेल तर कायमस्वरुपी आणि मोफत द्या, असेही नगरसेवक म्हणाले. 

तिर्थ क्षेत्र आळंदीला सोमवारपासून  (दि. १५) पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड दोन लाख लीटर पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक हजार लिटरला अडीच रुपये दराने शुल्क आकारण्यात येणार आहे. या विषयाला कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. 

या विषयावर चर्चेला सुरुवात करताना  नगरसेवक दत्ता साने म्हणाले, आळंदीकरांना पाणी देणे गरजेचे आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा अगोदर सुरळीत करणे गरजेचे आहे. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागात पाणी कमी दाबाने येत आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत केल्यानंतरच आळंदीला पाणी देण्यात यावे. आळंदीला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. एक महिना पाणी देऊन त्यांना आशा लावू नका. कायमस्वरुपी पाणी देण्यासाठी प्रयत्न करा.

माजी महापौर ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, पवना धरणात पाणीसाठा मुबलक आहे. जुन महिना जवळ आला आहे. तरीही, पाणी कपात केली आहे. एकदिवसाआड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.  जेवढे पाणी देणार आहेत, तेवढे अधिक दाबाने पाणी दिले पाहिजे.  

विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, आळंदीला दरवर्षी पिंपरी महापालिका पाणी देत आहेत. तसेच आळंदीला पाणी देण्यास राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचेही त्या म्हणाल्या. वर्तमानपत्रातून टँकर लॉबीचा बातम्या वाचयला मिळत असून त्याचे काय गौडबंगाल आहे, ते पारदर्शक कारभार करणा-