ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजेश नंदा यांचा वृद्धाश्रमात करूण अंत

चिंचवड दि. २२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजेश नंदा यांचे काल (दि.२०) रात्री आठच्या सुमारास आकुर्डी येथील वृद्धाश्रमात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून नंदा यांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यांच्या निधनाची बातमी नातेवाईकांना कळवली. मात्र, कोणीही त्यांच्या अंत्यसंस्काराला येण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे  वृद्धाश्रमाच्या कर्मचा-यांनीच त्यांच्यावर अंत्यविधी केला.

राजेश नंदा यांनी १०६९ मध्ये नतीजा हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. ज्यामध्ये विनोद खन्ना, जुनियर मेहमूद, बिंदु यांनी काम केले होते. तर १९७१ मध्ये बेहरुपिया हा चित्रपट दिग्दर्शित केला ज्यामध्ये हेलन, धीरज कुमार यांनी काम केले होते. याबरोबरच त्यांनी १९६२ पीक पॉकेट तर १९६५ साली संत तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. राजेश नंदा हे ८० वर्षाचे होते.

त्यांना वर्षभरापूर्वी प्रसिद्ध गझलकार अशोक खोसला यांनी आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रम येथे आणले. अशोक खोसला हे वृद्धाश्रमाचे संचालक आहेत. याविषयी खोसला यांच्याशी संपर्क साधला असता खोसला म्हणाले की, मला प्रसिद्ध कवी सुधीर शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की दिग्दर्शक नंदा हे एका रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक त्यांच्याजवळ नाही तसेच त्यांना ते सांभाळत नाहीत. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही. तर एकाने त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर मी त्यांना आकुर्डी येथे घेऊन आलो शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली.

यावेळी सुधाकर शर्मा यांच्याशीही संपर्क साधला. यावेळी त्यांनीही आम्ही त्यांना १५ वर्षापासून सांभाळत होतो. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक आम्हाला भेटले नाहीत नंदा यांनीही कधी आम्हाला काही सांगितले नाही. त्यानंतर आम्ही त्यांना खोसला यांच्याकडे पाठवले. नंदा यांची मोजकीच माहिती वृद्धाश्रमाकडे आहे. ते फक्त एक भाऊ भाच्चीने माझी सर्व संपत्ती लुटली, असे Posted On: 22 May 2017